पुण्यात धक्कादायक प्रकार! पतीला आधी दारू पाजली; मग प्रियकरासोबत मिळून धक्कादायक कृत्य, व्हिडिओही बनवला अन्….उडाली खळबळ


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने आपल्या पतीला घरी बोलावून घेतले आणि त्यानंतर प्रियकरासोबत मिळून रबरी पाईप आणि लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रियकर पतीला मारहाण करत असताना पत्नीने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला.

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे मारहाणीत जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी (२८ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना भोसरीतील घरी बोलावून घेतले होते. तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर अजय नात्रे (वय ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी मिळून अमोलला दारू पाजली. त्यानंतर किरकोळ वादाचे निमित्त करून दोघांनी अमोलला मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रियकर अजय नात्रे हा अमोलला पाईपने बेदम मारत असताना, आरोपी पत्नीने पतीचा ओरडतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या क्रूर मारहाणीत अमोलच्या मान, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी अमोल यांनी मंगळवारी (३१ मार्च) भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

दरम्यान, भोसरी पोलिसांनी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आपल्या पतीवर अत्याचार केल्याची ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!