केबिनमधील वाईट खेळी समोर; गुंगीचं औषध, वेदनाशामक गोळ्या…डॉक्टरांनी सांगितले अशोक खरातने महिलांना काय दिलं…


नाशिक : नाशिकमधील अशोक खरात याला आज (२ एप्रिल) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पहिल्या प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर, काल (१ एप्रिल) त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सध्या SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे, आणि या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणात SIT कडून तीन ते चार डॉक्टरांची चौकशी झाल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. नाशिकमधील एका वरिष्ठ डॉक्टराचीही चौकशी करण्यात आली आहे. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांची एसआयटीने सखोल चौकशी केली आहे.

या चौकशीत समोर आले आहे की, अशोक खरातने या डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ‘ओशनो जल’ या नावाखाली उपलब्ध औषधे आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्या. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे गर्भवती झालेल्या महिलेच्या बाबतीतही अशोक खरातने ओकस कार्यालयाद्वारे गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचे आढळले आहे.

अशोक खरातला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत.

सरकारवाडा पोलिसांत अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पूजाविधीच्या बहाण्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार केला आणि तिचा गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले आहे.

पीडित महिला २०१३ मध्ये आई-वडिलांसोबत अशोक खरातकडे गेले होते, कारण विवाहस्थळावर सुखी संसार होईल का, याबाबत मार्गदर्शन हवे होते. अशोक खरातने सुखी संसारासाठी इशानेश्वर मंदिर येथे पूजा करण्याचा सल्ला दिला. महिलेला दोन अपत्य झाले, मात्र काही काळानंतर घरगुती भांडणे वाढल्याने पतिपत्नी विभक्त झाले.

त्यानंतर पीडित महिला पुन्हा आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्यबाबत मार्गदर्शनासाठी गेली, आणि तेव्हापासून आरोपीने महिलेकडे वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली. पुढच्या भेटीत आरोपीने महिला जवळ जाण्याचा प्रयत्न केला. महिला दिल्लीला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेल्यानंतरही, मुलांच्या भविष्याची काळजी घेऊन पुन्हा नाशिक परतल्यावर आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरूवात केली.

अशोक खरातने तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून, “तुझा घटस्फोट लिखित होता. तू मागिल जन्माची अप्सरा आहे. मी अवतारी पुरूष आहे. माझे दोन विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार” असे सांगून महिला अत्याचार केले. महिला प्रेग्नंट झाल्यानंतर आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात घडवून आणला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!