राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका; शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, घेतले 6 मोठे निर्णय


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (1 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीं शिष्यवृत्ती, साकळाई उपसा सिंचन योजना, अमरावतीमधील क्रीडा संकुल, अनुसूचित जाती उपवर्गीकरण निवेदन या निर्णयांचा समावेश आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले निर्णय

जलसंपदा विभाग – अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार

पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग – महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार.

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग – अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा

सामाजिक न्याय विभाग – अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

महसूल विभाग – भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

दिव्यांग कल्याण विभाग – राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!