नरहरी झिरवळांची विकेट पडणार?प्री कॅबिनेट बैठकीला दांडी, पक्ष राजीनामा घेणार की अभय देणार?


पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा तृतीय पंथियासोबत व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.याप्रकरणी झिरवळ यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा सुरू असतानाच मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्री कॅबिनेट बैठकीला दांडी मारली आहे.त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जाणार की त्यांना पक्ष अभय देणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्यतिरिक्त बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईल यांचीही प्री कॅबिनेटला पाठ फिरवल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ उपस्थित होते. या घाडमोडींमुळे झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार की त्यांना पक्ष अभय देणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची प्री कॅबिनेट बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा होऊन पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे होते. मात्र या बैठकीला ते स्वतः अनुपस्थित राहिले. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

दरम्यान तृतीयपंथांसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणात काल पवन यादव याच्या भावाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडर पवन यादव याने कफ परेड पोलीस ठाण्यात भावाविरोधात तक्रार दिली. त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. FDA मध्ये नोकरी लाव नाहीतर मंत्र्यांसोबतचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सर्व प्रकरणावर प्रि कॅबिनेट बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना मंत्री झिरवळ यांनी दांडी मारल्याने पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!