मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा मोठा दावा; म्हणाल्या…


मुंबई : अशोककुमार खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून महिलांना जाळ्यात ओढण्याची त्याची मोडस ऑपरेंडी उघड होत आहे. काही महिलांना थेट त्याच्याकडे पाठवले जात असल्याचाही धक्कादायक दावा समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’च्या आजी-माजी सदस्यांची चौकशी सुरू होणार असून, माजी सदस्या रुपाली चाकणकर यांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. मात्र, त्या अद्याप चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत.

दरम्यान, चौकशीला गैरहजर राहिल्यास अटकेची कारवाई होऊ शकते, ही कायद्याची प्रक्रिया असल्याचा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर या स्वतःहून एसआयटीसमोर हजर होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. अशोककुमार खरात प्रकरण एसआयटीकडे जाऊन आठ दिवस उलटले असून, काल रुपाली चाकणकर यांना एसआयटीचे समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आता आजाराचे कारण देऊन चौकशी टाळता येणार नाही. एसआयटीने कुठल्या तरी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे, अशा आविर्भावात त्या असतील; पण हे निमंत्रण नसून एका गंभीर गुन्ह्याशी संबंधित समन्स आहे, असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे प्रकरणात आणखी खळबळ उडाली असून, चाकणकर या चौकशीला हजर राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, पहिल्यांदा आजारपणाचं कारण दिलं… पण त्यानंतर काय? चौकशीसाठी जाणं त्यांना अपरिहार्य आहे. जर त्या हजर झाल्या नाहीत, तर अटक ही कायद्याचीच प्रक्रिया आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, कायद्यासमोर कुठलाही तोरा चालत नाही. मात्र त्यांना या प्रकरणाचं गांभीर्यच नाही. अशी व्यक्ती महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी होती, याचं मला दु:ख वाटतं. तसेच त्यांनी तीव्र शब्दांत टीका करत, ही ‘मेंटॉस बाई’ आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही केली. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!