मोठी बातमी! राज्यातील काँग्रेस खासदाराच्या गाडीला पहाटे भीषण अपघात, फॉर्च्युनर कारचा चक्काचूर….


नागपूर : आज पहाटे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. प्रशांत पडोळे हे सोमवारी पहाटे आपल्या काही सहकाऱ्यांसह नागपूरला निघाले होते. यावेळी त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

या अपघातात पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात खासदार पडोळे हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत तपास सुरू आहे. दिल्ली येथे अधिवेशना सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे भंडाऱ्यावरून नागपूर विमानतळावर जात होते.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडी नुकसान झालं आहे. अचानक रस्त्यात ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले आहेत. ते सध्या सुखरूप असल्याची माहिती आहे.

दरम्यान, याच मार्गावर हा तिसऱ्यांदा अपघात घडला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी तत्काळ भेट देऊन सर्वांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. यानंतर सर्वांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!