इंडिया आघाडी फुटली!विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार रिंगणात?

पुणे : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी तयारी सुरू असताना इंडिया आघाडीत फूट पडली असल्याची माहिती समोर आली आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 284 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली असून अधीर रंजन चौधरी हे 30 वर्षानंतर ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना बहरामपुरमधून तिकीट देण्यात आले आहे. मालतीपूरमधून मौसम नूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसची युती होण्याची चर्चा सुरू होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी युती करण्यास नकार दिल्याने काँग्रेस त्यावेळी देखील स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी देखील कॉँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

भाजपने या जागेसाठी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने हेमताबादमधून अनामिका राय, जांगीपूरमधून मोहम्मद इम्रान अली, तुफानगंजमधून देवेंद्रनाथ आणि दिनहाटामधून हरिहर राय यांना उमेदवारी दिली आहे.इंडिया आघाडी म्हणून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हा एकत्र आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडी फुटली आहे का? अशा चर्चा सुरू आहे.