दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर..

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी -मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना निकालाच्या तारखा समोर आल्या आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने निकालाबाबत माहिती दिली अशी की, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१५ मे नंतर) बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर आठ ते १० दिवसात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र ही अधिकृत घोषणा नाही. मागील काही वर्षांतील अंदाज पाहिला तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर दोन आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
निकालाच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी बोर्डाकडून याची अधिकृत माहिती दिली जाईल

२०२६ निकालाचा अंदाजित वेळ (दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन उपलब्ध होतो).
१२ वी (HSC) : मे २०२६ चा पहिला किंवा दुसरा आठवडा
१० वी (SSC): मे २०२६ चा दुसरा किंवा तिसरा आठवडा
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांनी असा चेक करावा निकाल
विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका.त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.