भाजपचे सत्तेचे फक्त गोडवे गायचे काय? वीज, पाणी खते, निधी मिळेना! शोभेच्या पदापेक्षा राजीनामा देण्याचा शिंदवणेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा…


उरुळीकांचन: भर उन्हाळ्यात वीज, पाणी व खते मिळत नसल्या सहीत पक्षाकडून सार्वजनिक विकास व वैयक्तिक स्वरुपाची नागरकांची कामे होत नसल्याने सत्ताधारी पक्ष असून प्रशासन व्यवस्थेत काडीचे स्थान मिळत नसल्याने संतप्त शिंदवणेच्या भाजप कार्यकर्त्यांसह तालुका पदाधिकारी गुरुनाथ मचाले यांनी पक्षाचा थेट राजीनामा देण्याचा इशारा जिल्हा व तालुका नेतृत्वाला दिला आहे.

कडक उन्हाळ्यामुळे शेतीला पाण्याची गरज असताना मुळा-मुठा कालव्याभोवतालच्या गावांना मुबलक वीज पुरवठा न मिळणे, प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेणे तसेच खते, बियाणे मिळण्यासहित खडकवासला पाणी वाटप निय़ोजनात शेतकऱ्यांना दाद न देणे,कालव्याला पाणी असून पाण्याला अटकाव करणे तसेच वीज रोहित्रे बदलण्याची मागणी करुनही महावितरणकडून दाद न देणे अशा पध्दतीची वागणूक देऊन सत्ताधारी भाजप पक्षामध्ये कार्यरत असून कामे मार्गी लागत नसल्याने पदाधिकारी संतप्त आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी रस्ते, पाणंद रस्ते, साकव व विकासनिधींना पक्षाकडील वरिष्ठ नेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्याने पदाधिकारी संतप्त आहेत. याऊलट राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांना तालुक्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके हे पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठिमागे उभे राहत असल्याने त्यांच्या छोट्याश्याही कामांना पाठबळ मिळत असल्याने सत्ताधारी असूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य मिळत नसल्याने भाजपचे काम करुन काय उपयोग असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे. पदाधिकारी असुन लोकांची कामे मार्गी लागत नसल्याने कार्यकर्ते नेतृत्वावर नाराज असल्याची भावना पदाधिकारी बोलत आहे.

निवेदन देऊन प्रशासन हालत नाहीत…

वीजेच्या त्रासाला शेतकरी कंटाळले असताना साधे रोहित्र बदलून देण्याची मागणीवर महावितरण निवेदनाला केराची टोपली दाखवित असतील तर प्रश्न कसे सोडणार हा मोठा प्रश्न आहे. कालव्यातील पाणी उचलण्यास पायबंद,वीजेचा पुरवठा न मिळणे व जिल्हा नियोजन समितीकडुन निधी मिळत नसल्याने पक्षाच्या भवितव्याच्या विचार करण्यापेक्षा राजीनामा योग्य असा सूर या पदाधिकाऱ्यांत आहे.

भिक नको कुत्रे आवार…

केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भाजपचे जिल्ह्यात पदाधिकारी मात्र जोमात आहेत.पक्षाच्या यशाचे  हे पदाधिकारी गोडवे गात असले तरी पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामेच होत नसल्याची स्थिती आहे. पक्षाची वरिष्ठ मंडळी लक्ष पुरवित नसल्याची परिस्थिती आहे.  वरिष्ठ मंडळी पक्ष प्रचाराचा पूर्ण अजेंडा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर लादत आहे. ‘मन की बात”, सभासद नोंदणी , बूथ बैठक तसेच विविध कार्यक्रम या पदाधिकाऱ्यांकडून करुन घेतले जात आहे. मात्र गावपातळीवर काम करण्याची पदाधिकाऱ्यांवर वेळ आली तर काम हे वरिष्ठ कामे मार्गी लावत नसल्याची व्यथा आहेत. व्यासपीठावर भाषणबाजी करणाऱ्यांना प्राधान्य मात्र सामान्य पाठिमागे किंमत नसल्याची भावना कार्यकर्ते खुलेआम बोलत असल्याने भाजपात ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी आवस्था आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!