उरले शेवटचे 10 दिवस! लाडक्या बहिणींनो e-KYC मध्ये दुरुस्ती करा नाहीतर 1500 रुपये बंद?

मुंबई : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे.ई केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी त्यांना ही शेवटची संधी असणार आहे त्यामुळे 31 मार्च च्या आत दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा महिलांना मिळणारा पंधराशे रुपयेचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी अखेरचे 10 दिवस शिल्लक आहेत. पण अपुरी कागदपत्रे अथवा इतर कारणांमुळे काही महिलांना मुदतीत प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांना 1500 रूपयांचा लाभ बंद होण्याची भीती वाटत आहे. ईकेवायसी केली नाही, तर पात्र असतानाही 1500 रूपये बंद होणार आहेत. कारण, त्यांचे नाव लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळले जाणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला चिंतेत आहेत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 45 लाखांपेक्षा जास्त महिलांना वगळण्यात आलं आहे. अटी आणि नियमांचं पालन न करणाऱ्या लाडक्या बहिणींवर कडक कारवाई देखील करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ईकेवायसी अखेरच्या टप्प्यात आहे.त्यानुसार 31 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत संपणार आहे.

दरम्यान सरकारकडून ईकेवायसीला मुदतवाढ दिल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? याची प्रतिक्षा लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.मात्र आता लाडकीच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रूपये एकत्र येण्याची शक्यता आहे.