पुण्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, घटनेने पुणे हादरल

पुणे : पुण्यातील सहकारनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तुझ्यावर माझे प्रेम आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला.

यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मुलीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी सोमनाथ पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी आरोपी सोमनाथ पवार हा रहात होता. त्याने फिर्यादीस माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे सोबत लग्न करशील का अशी विचारणा केली. तेव्हा तिने नकार दिला. यावरून हा वाद सुरू झाला.

त्याने तिला आपल्या गाडीवर बसवून घरी साडतो असे सांगून स्वत:च्या घरी नेले जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
यामुळे तरुणीला एकच धक्का बसला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्यादी दिली असून पोलीस उपनिरीखक राजगुरु तपास करीत आहेत. याबाबत आता चौकशी सुरु आहे.