पाच हजाराची माघितली घूस घेतले तीन हजार; शेतकऱ्याचे ट्रॅक्टर अनुदान देण्यासाठी लाच स्विकारताना पुरंदरचा कृषी मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…


पुणे : पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, पुरंदर पंचायत समितीतील मंडळ कृषी अधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5,000 रुपयांची मागणी करून नंतर तडजोडीअंती 3,000 रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ही मागणी पंचायत समिती कार्यालय, सासवड येथे पंचांसमक्ष झाल्याचे निष्पन्न झाले.

अमोल सुनील सुतार, (वय 31 वर्षे, पद- मंडळ कृषी अधिकारी, सासवड (वर्ग-2) पंचायत समिती कार्यालय, पुरंदर, जिल्हा पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदाराने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा प्रस्ताव पंचायत समिती, सासवड (ता. पुरंदर) येथील मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला होता.

दरम्यान, हा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी अमोल सुतार यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 29 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

त्यानंतर पडताळणीदरम्यान सुतार यांनी सुरुवातीला 5,000 रुपयांची मागणी करून नंतर तडजोडीअंती 3,000 रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ही मागणी पंचायत समिती कार्यालय, सासवड येथे पंचांसमक्ष झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत 20 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांचेही या कारवाईत मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा एजंटकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!