ड्रायव्हिंग लायसन्सबाबत राज्याने घेतला मोठा निर्णय! नवा नियम लागू, जाणून घ्या…


पुणे : ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या बदलानुसार, लायसन्सची 15 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर ते नूतनीकरण करताना अर्जदाराची चेहऱ्याद्वारे ओळख पडताळणी केली जाणार आहे.
यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, बनावट कागदपत्रे किंवा फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे. जुन्या छायाचित्रांचा गैरवापर करून किंवा चुकीच्या ओळखीच्या आधारे लायसन्स नूतनीकरण करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता एआय आधारित सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.

हे तंत्रज्ञान 15 वर्षांपूर्वीच्या परवान्यावर असलेल्या फोटोशी अर्जदाराच्या सध्याच्या चेहऱ्याची अचूक पडताळणी करून त्याची खरी ओळख निश्चित करेल. सायबर फसवणूक आणि ओळख चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरणार असल्याचे मानले जात आहे.
ही नवी प्रणाली परिवहन आयुक्त उमेश जोगा यांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आली आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून, सुरुवातीला भोपाळ येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मध्य प्रदेशात सध्या सुमारे 70 लाख ड्रायव्हिंग लायसन्स प्रचलित आहेत, तर दरवर्षी सुमारे 6 लाख नवीन परवाने जारी केले जातात. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नूतनीकरणासाठी अर्ज येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही नवी प्रणाली प्रशासनाचे कामकाज अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी अधिकृत परिवहन पोर्टलवर जाऊन “Driving License Related Services” हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘Madhya Pradesh’ निवडून ‘Apply for DL Renewal’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. पुढे जुना लायसन्स क्रमांक आणि जन्मतारीख टाकून अर्ज पूर्ण करावा लागतो
. यासोबत फॉर्म-9, जुना परवाना आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास फॉर्म-1A म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. नूतनीकरण शुल्क भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आरटीओमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते.