काय सांगता! मेट्रो तिकीटांवर 50 टक्क्यांची सूट! Uber वरून बुक केल्यास सवलत, जाणून घ्या…

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एका नवीन सेवेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी आता प्रवास सोपा करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. Uber Appमध्ये ONDC इंटिग्रेशन यशस्वी झाले असून आता मेट्रोचे तिकीट थेट उबरवरून काढता येणार आहे.

तसेच आता तिकिटांवर 10 रुपयांपर्यंत 50 टक्के सवलत सुद्धा मिळणार आहे. यामुळे आनंदाची बातमी मिळाली आहे. यापूर्वी फक्त वर्सोवा-घाटकोपर मार्गासाठी उबरद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध होती. आता यामध्ये मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाही समावेश करण्यात आला आहे.
सवलतीमुळे तिकीट स्वस्त दरात काढतात येणार आहे. मेट्रो लाइन 2A दहिसर पूर्व ते डीएन नगरदरम्यान धावते. तसेच मेट्रो 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावते. यामुळे येणाऱ्या काळात प्रवासी संख्या देखील वाढणार आहे. या मार्गावरील तब्बल 70 टक्के प्रवासी सध्या ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करतात.

यासाठी मुंबई वन ॲप, व्हॉटसॅप किंवा NCMC कार्डचा वापर करतात. त्यामुळे या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध झाले असून ते आपल्या सोयीनुसार आपला आवडता पर्याय निवडू शकतात.
दरम्यान, मुंबई मेट्रो तिकीट बुकिंगसाठी नवी, ईएमटी, टम्मॉक, ट्रिपोझो, वन तिकीट, ऑटोपे, मॅजिकपिन, चलो, रेडबस, हायवे डिलाइट आणि पेलोकल यासारख्या ONDC-सक्षम ॲपवर तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून आता प्रवासी संख्या देखील वाढणार आहे.