संघर्ष अजून संपेना! 20 हजार रशियन सैनिक मारले गेले, धक्कादायक माहिती आली समोर


 

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरूच आहे. यामुळे अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत. यामुळे हा संघर्ष कधी थांबणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

असे असताना पूर्व युक्रेनमधील पाच महिन्यांच्या लढाईत 20,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आणि 80,000 जखमी झाले, असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे.

डॉनबासमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्याचा रशियाचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. रशिया खरोखरच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश काबीज करू शकला नाही. यामुळे आता पुढे काय परिणाम होणार हे सांगणे कठीण आहे.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्हाला अंदाज आहे की रशियाचे बळी 100,000 पेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 20,000 कारवाईत मारले गेले आहेत. रशिया अजूनही युक्रेनच्या अनेक क्षेत्रांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!