लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! फेब्रुवारी-मार्चचा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीचा लाभ न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता, मात्र त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही.

मार्च महिना संपत येत असतानाही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांच्या ऐवजी थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित हप्ता 15 एप्रिलपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे लाभ मिळण्यास उशीर झाला असला तरी दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याने लाभार्थींना काहीसा दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू ठेवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेसाठी सरकारकडून आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!