पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील गर्दीतून सुटका करण्यासाठी नवा ‘मेट्रो प्लॅन’ मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : पुण्यात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाचा आता मोठा विस्तार होणार आहे. शहरातील मेट्रो सेवा यापुढे केवळ शहरापुरती मर्यादित राहणार नसून उपनगरांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखण्यात आली आहे.

राज्य सरकारने नव्या दोन मेट्रो मार्गांना अधिकृत मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. सध्या पुणे मेट्रो अंतर्गत दोन प्रमुख मार्गांवर सेवा सुरू आहे. पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट / सिव्हिल कोर्ट आणि Vanaz ते Ramwadi या मार्गांवर दररोज हजारो प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.

तसेच Hinjewadi ते Shivajinagar हा मेट्रो मार्गही अंतिम टप्प्यात असून तो लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मेट्रो विस्तारासाठी दोन महत्त्वाच्या मार्गांना हिरवा कंदील देण्यात आला आहे.

यामध्ये हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मार्गांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गांची एकत्रित लांबी सुमारे 16 किलोमीटर असणार आहे. या मार्गावर सुमारे 14 उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो स्थानके उभारण्याची योजना आहे. भविष्यात या मार्गाचा विस्तार प्रस्तावित Purandar Airport पर्यंत करण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. पुढे हा मार्ग बोगद्याद्वारे थेट विमानतळाशी जोडण्याचाही विचार केला जात आहे.

दरम्यान, याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे रामवाडी ते वाघोली हा मेट्रो मार्ग. या मार्गाची लांबी सुमारे 11 किलोमीटर असणार आहे. सध्या पुणे–अहिल्यानगर हायवे वर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

वाघोली परिसरात आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था तसेच मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प विकसित झाले आहेत. त्यामुळे या मेट्रो मार्गाचा फायदा हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!