फॉर्च्यूनर गाडीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला जेरबंद, ४० लाखांचा माल केला जप्त, लोणी काळभोर येथे मोठी कारवाई…


लोणी काळभोर : अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर व लोणी काळभोर पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन महाराष्ट्र राज्यामध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक करणे, जवळ बाळगणे व विक्रीसाठी कब्जात ठेवणे बंदी असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता अंमली पदार्थाचा साठा विक्रीकरीता जवळ बाळगणा-या इसमास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचेकडून १० लाख ६० हजार २८० रुपये किंमतीचा ५३ किलो १४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच ३० लाख रुपये किंमतीची फॉच्युनर गाडी व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ४० लाख ७० हजार २८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातून अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत यापुर्वीच आदेश दिले आहेत. या अनुषंगाने बुधवार (११ मार्च) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्याचेकडील पोलीस अधिकारी व पथक असे पुणे शहर हद्दीत गस्त करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत एक इसम पांढरे रंगाचे फॉर्च्युनर गाडीमधून गांजाचा मोठा साठा विक्री करीता थेऊर परीसरात घेवून येणार आहे. अशी बातमी मिळाली होती.

त्यामुळे मंगळवार रात्री ११ वाजले पासूनच अंमली विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लोणी काळभोर पोलीसांच्या समवेत थेऊर येथे ठिक ठिकाणी सापळा रचुन प्रितम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळमळा, म्हसोबा मंदिरा जवळ, थेऊर, पुणे) यास ११ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारांस धुमाळ मळा, थेऊर फाटा, पुणे येथून ताब्यात घेवून त्याचे कब्जातून १० लाख ६० हजार २८० रुपये किंमतीचा ५३ किलो १४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच ३० लाख रुपये किंमतीची फॉच्युनर गाडी व१० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ४० लाख ७० हजार २८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गांजा आपणास कट्टीमनी व अक्षय नावाचे इसमाने विक्री करीता दिलेला असल्याची कबुली कुंजीर यांने पोलिसांना दिली आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर, पोलीस हवालदार विजय शहाजी कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.वरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे ३ शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिर्के व महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे, तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस अंमलदर आण्णा माने, सुरज कुंभार व अशोक गिरी यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!