माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी किरकोळ जखमी…


जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत.

ही घटना जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात घडली. फारूक अब्दुल्ला त्यांच्या परिचयाच्या एका वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तिथं गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडलं आहे. कमल सिंह जमवाल असं त्याचं नाव असून पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी झुडपांमध्ये लपून बसला होता, मात्र सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी (11 मार्च) फारूक अब्दुल्ला जम्मूमध्ये होते. त्यांच्या पक्षातील एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नासाठी ते बँक्वेट हॉलमध्ये आले होते. जवळपास एक तास ते समारंभात थांबले होते. मात्र समारंभातून बाहेर पडताच त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं जम्मू परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी…

या घटनेच्या वेळी फारूक अब्दुल्ला यांच्यासोबत जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. गोळीबारादरम्यान त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!