पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी! आता वाहतूक कोंडी कायमची मिटणार, रोग रोडच्या कामाला अखेर सुरुवात, जाणून घ्या मार्ग….

पुणे : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून रिंग रोडच्या कामाला वेग मिळाला आहे. पुण्यातील बाह्य रिंग रोडच्या पश्चिम कॉरिडोरवरील काम आता जलद गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे आता पुणेकरांची वाहतूक कोंडी कायमची मिटणार आहे.

रिंग रोडच्या कामाला सुरुवात होऊन जवळपास १ वर्ष झाला आहे. हा मार्ग १६८.६० किमी लांब असणार आहे. यातील बाह्य रिंग रोडचा मार्ग ११० मीटर रुंद असणार आहे. यामुळे मुंबई ते बंगळुरु प्रवासासाठी पुण्यातून जाण्याची गरज नाही. तुमचा मुंबई-बंगळुरु प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
पुणे रिंग रोडसाठी जवळपास ५५,६२२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा रिंग रोड पुण्याच्या बाहेरुन जाणार आहे. या मार्गावर आठ दुहेरी बोगदे असणार आहे. सात मार्ग, १० पेक्षा जास्त पूल असणार आहेत.

२६ पूल, २१ ओव्हरपास, ९ पादचारी मार्ग मिळून हा रिंग रोड तयार केला जाणार आहे. यामधील पश्चिम कॉरिडॉरवरील काम सुरु झालं आहे. यामुळे मुंबई, बंगळुरु, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर हा प्रवास सुसाट होणार आहे.
पुणे रिंग रोडवर संपूर्ण अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना कुंपण असणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुरक्षित असणार आहे.
पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात काम…
पुणे बाह्य रिंग रोडच्या प्रकल्पात दोन टप्पे आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात काम होणार आहे. पहिला टप्पा ६५.४५ किमी लांब असणार आहे. दुसरा टप्पा १०३.१५५ किमी लांब असणार आहे. पश्चिम कॉरिडोर हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर असणार आहे.
उर्सेवरुन थेट पुणे बंगळुरु महामार्गावर शिवारेपर्यंत जोडला जाणार आहे.यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या पश्चिम कॉरिडोरच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाला असून बांधकामाला वेग आला आहे.