“99 टक्के जनतेच्या मनात शंका, अजितदादांचा घात की अपघात?महायुतीच्या माजी नेत्याची रोहित पवारांना साथ..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघात चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मंत्री महादेव जानकर यांनी रोहित पवारांना साथ देत अजितदादांच्या विमान अपघातावरून हल्लाबोल चढवला आहे. 99 टक्के जनतेच्या मनात शंका आहे की अजितदादांचा घात की अपघात? याचा सत्य समोर आलंच पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील इंदापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली. त्यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत महाराष्ट्रातील 99 टक्के जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. हा अपघात होता की घातपात? याचे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या अहवालावर विसंबून न राहता, केंद्र सरकारने सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना जानकर म्हणाले, अजितदादांच्या विमाना अपघाताच्या केवळ पोलीस तपासावर जनता समाधानी नाही. यामागे कोणते मोठे कारस्थान आहे का, हे शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास व्हायला हवा. जे सत्य आहे ते बाहेर यावे, हीच राष्ट्रीय समाज पक्षाची अधिकृत भूमिका आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर देखील अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले.
जर सरकारला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल, तर त्यांनी या प्रकरणाचे ‘दूध आणि पाणी’ वेगळे करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे,असा हल्लाबोल जानकर यांनी चढवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!