शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत सरकारकडून बदल; काय होणार फायदा?, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेदरम्यान नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवण्याची ऑफलाइन सुविधा देण्यात आली आहे. नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर हा फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, २०२१ पासून ई-पीक पेरा नोंदणी प्रणाली राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे.

पुढे २०२५-२६ पासून ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे, जीपीएस त्रुटी निर्माण होणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अनुपलब्धता अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे नेटवर्क समस्यांवर उपाययोजना करणे, ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणे, जनजागृतीसाठी विशेष शिबिरे आयोजित करणे तसेच जिल्हा स्तरावर हेल्पडेस्क उभारण्याबाबत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा सवाल त्यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!