इस्त्राईल-इराण संघर्षामुळे पुण्यातले उद्योग-हॉटेल भरडणार ; गॅसच्या किमतीचा भडका उडणार?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इस्त्राईल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाची धग आता भारतापर्यंत पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींचा भडका उडणार आहे.युद्धाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, सरकारी तेल कंपन्या असलेल्या भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने मोठी पावले उचलली आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण येथील गॅस प्लांटमधून जिल्ह्यातील सर्व डीलर्सना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डर्स घेऊ नका, असे आदेश कंपन्यांनी दिल्याने व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिक, कॅन्टीन आणि लघु उद्योगांना बसणार आहे.

इस्रायल इराण संघर्षाच्या युद्धामुळे ऐन सुटीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत गॅस सिलेंडरच्या नवीन ऑर्डर्स बंद झाल्याने व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. पुरवठ्यात व्यत्यय आल्यास हॉटेल व्यवसायकांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

दरम्यान या युद्धामुळे आयात महागल्याने गॅस वितरणाची साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती लवकर निवळली नाही, तर घरगुती गॅस पुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात इंधन आणि गॅसच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!