धुळवड खेळायला गेलेल्या 22 वर्षीय कृष्णाचा भयंकर अंत ; मित्रांसोबत गेला अन् रक्तानं शरीर…

बीड : धुलीवंदन साजरा करण्यासाठी निघालेल्या बीड मधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या अपघातात बीडमधील रामतीर्थ परिसरात राहणाऱ्या 22 वर्षांचा कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.ज्या हातांनी धुलिवंदन खेळायचं होते, ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धुलीवंदन साजरा करण्यासाठी कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रोड वरून जात असताना चालकाच गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली.गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्या हातांनी धुलिवंदन खेळायचं होते, ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता.
या भीषण अपघातात प्रसाद खोले,यश पेंढारे आणि अन्य एक जण जखमी झाले आहेत.मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं, पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती. आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं, कृष्णा अशी जोरात हाक मारुन रडत होते. त्याच्या इतर मित्रांवर सध्या बीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत

कृष्णाच्या मृत्यूची बातमी समजताच रामतीर्थ परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून पहाटे धुळवड खेळण्यासाठी कृष्णा बाहेर पडला होता त्याच घरात त्याच्या आई-वडिलांचा हंबरडा काळीज चिरून टाकत आहे.