पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीत कोण बजावणार ! अजित पवारांच्या निधना पश्चात सुनेत्रा पवार की पार्थ पवार पक्षाची जिल्ह्याची कमांड स्विकारणार ? जिल्ह्याचे लक्ष निवडीकडे लागून ….!

जयदिप जाधव उरुळी कांचन : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा ग्रामीणचे सर्वेसर्वा,नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधन पश्चात पुणे जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष,तसेच पंचायत समितींच्या सभापतीपदांवर कोण निर्णय घेणार,म्हणून जिल्ह्यात व तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार हेराज्यसभेची खासदारकीसाठी अर्ज दाखल करत आहेत.या पदांसाठी पक्षाची नव्याने जबाबदारी स्विकारलेल्या सुनेत्रा पवार की पार्थ पवार हे जिल्ह्याची कमांड स्विकारणार या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे जिल्हा परिषदेवर १९९९ च्या राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सर्वश्री निर्णय दिवंगत नेते अजित पवार यांनी घेतले आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेवर २००२, २००७, २०१२,२०१७ तर त्यांच्याअकाली निधनानंतर चालू २०२६ वर्षात राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.यंदाच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने सर्वाधिक७३ पैकी तब्बल ५२जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील वाटचालीसाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पक्षाची कमांडकायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेचविषय समित्यांचे सभापती व पंचायत समित्यांवर सभापतीपदासाठीराष्ट्रवादीच्या योग्य पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याची कसब नव्या नेतृत्वावर येऊन पडल्याने पक्षाअंतर्गत ह्या नियुक्त्या कशा होणार म्हणून जिह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुर लोकसभा मतदारसंघ तर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन या निवडी पक्षाला कराव्या लागणार आहे. पुणे जिल्हा परिषद वतालुका पंचायत समिती ही सत्ता केंद्रे या भविष्यातील निवडणुकीस महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने या निवडी नव्या नेतृत्वाला कराव्या लागणार आहे. अजित पवार यांच्या निधन पश्चात पक्षात या यशाचे कौतुक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीनंतर तालुकावार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन केली आहे.तसेच पार्थ पवार यांनी जिह्यातील लोकप्रतिनिधी व सहकारक्षेत्रातील बडे नेते यांच्याशी चर्चा केली आहे.त्यामुळे या निवडीची जबाबदारी कोण करणार, म्हणून तर्कवितर्क सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ,सहकारी साखरकारखाने, दूध संघ, बाजार समित्या यांच्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.दिवंगत नेते अजित पवार हे तालुक्यातील सर्वंकष परिस्थिती पाहून त्यांनी या सहकार क्षेत्रावर आपले प्रभूत्व कायम ठेवले आहे. तर अनेक सहकारी या संस्थांमार्फत जनतेशी थेट नाळ जोडलीआहे. अशाच पध्दतीने जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाचे सत्ता केंद्रमजबूत ठेवण्यासाठी या निवडींची महत्वपूर्ण जबाबदारी पक्षालाअजित पवार यांच्या पश्चात पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळेराष्ट्रीय, राज्यस्तरावर यापुढे सुनेत्रा पवार अधिक लक्ष पुरवावेलागणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीणची सत्ता सूत्रे पार्थ पवारहे घेऊन नव्या प्रवासाला सुरुवात करतील काय म्हणून सर्वांचेलक्ष पंचायत समितीच्या ९मार्च व जिल्हा परिषदेच्या १८ मार्चच्या निवडीच्या प्रक्रियेकडे लागणार आहे.
गटबाजी रोखण्याचे आव्हान ? पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपने कॉग्रेस व राष्ट्रवादीतूनअनेक बडे पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. हे बडे प्रवेश घेऊन ग्रामीण भागात जिल्हा परिषदेवरभाजपला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. परंतू भविष्यातील वाटचाल गृहीत धरुन जुने पदाधिकारी यांची सांगडघालून पक्षाला काम करावे लागणार आहे. अशातच पक्षातील तालुक्यातील गटबाजी परिचित असल्याने लोकप्रतिनिधी व जुनेपदाधिकारी यांची सांगड घालून निवडी करण्याचे आव्हान या नव्या नेतृत्वावर असणार आहे.