प्रवेश झाल्यानंतर समजले ‘तो’ नेता आहे अट्टल गुन्हेगार, नंतर प्रवेशाला दिली स्थगिती


पुणे : सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे याचा काही दिवसांपुर्वी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश झाला होता. मात्र यानंतर सर्वच चर्चा सुरू झाली आहे.
प्रशांत दिघे याच्यावर खुन, खुनाच्या प्रयत्नासारखे दीड डझनहुन अधिक गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे.

काळेवाडी, पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत दिघेचा हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. त्याची पत्नी खुशबू आणि या दोघांच्या अडीचशे समर्थकांनीही त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
बारणे यांनी स्वत: शिवबंधन बांधून स्वागत केले. पिंपरी-चिंचवडमधील निवासस्थानी १८ मार्च २०२३ रोजी त्याचा सभारंभपुर्वक प्रवेश झाला.
पण त्याच्याबाबतची वस्तुस्थिती समजताच हा प्रवेश व त्याला दोन दिवसांपूर्वी दिलेले पद स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली.
दरम्यान, युवासेनेचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र हे खा. बारणेंच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर त्याचे खरे बॅकग्राऊंड समजताच शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी त्याचा प्रवेश स्थगित करणारे पत्र काल काढले.
