शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर मध्यरात्री खलबत ; वस्तादांना उमेदवारी कि नवा चेहरा?


मुंबई: महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.काल रात्री उशिरा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी नेत्यांनी पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा आग्रह धरला, मात्र पवारांनी त्यावर कोणतेही स्पष्ट उत्तर न देता मौन पाळणे पसंत केले.या मौनामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दहा राज्यामधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे.या जागांपैकी सहा जागा या सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात पडल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून स्वतः शरद पवार रिंगणात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मध्यरात्री ‘सिल्व्हर ओक’वर नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नेत्यांकडून आग्रह धरण्यात आला मात्र स्वतःच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करण्याऐवजी शरद पवारांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.या जागेबाबत आधी महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याशी चर्चा करा असे निर्देश पवारांनी दिले आहेत.

दरम्यान यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवार कोण असणार, याचा निर्णय आता महाविकास आघाडीच्या सामूहिक चर्चेनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!