१ मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक, साईभक्तांची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे कारण
शिर्डी : सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्याने शिर्डीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. १ मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे साईभक्तांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी की, शिर्डीत आता साई मंदिरात सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल (CISF) नियुक्ती करण्यात आली आहे. याच नियुक्तीला स्थानिकांनी विरोध केला आहे.
यामुळे आता शिर्डी ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून १ मे पासून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संग्राम कोते यांनी देखील सीआयएसएफच्या नियुक्तीसह अतर मागण्यांसाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
शिर्डी ग्रामस्थ यादरम्यान बंद पाळणार आहेत. या सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे. बंददरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरु राहाणार आहे.
CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.