शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती; ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅन केला, रिपोर्ट…..

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली आहे,तसेच त्यांचा सिटीस्कॅन देखील करण्यात आलेला आहे. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल साधारण आल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांना थकवा जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. त्यांची रक्ताची चाचणी आणि सिटीस्कॅन केला असल्याने त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.संध्याकाळनंतर डॉक्टर त्यांच्या अहवालांच्या आधारे पुढील निर्णय घेतील.त्यांना किती दिवस अॅडमिट ठेवायचे किंवा नाही, हे तेव्हा ठरवले जाईल.
शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असणारे विठ्ठल मणियार यांनी रुबी रुग्णालयात जाऊन आज शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी म्हटले की, शरद पवार यांची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुबी रुग्णालयात आणण्यात आले आहे. पूर्णपणे फिट आहेत आणि त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान शरद पवार यांना दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना काही त्रास झाल्यामुळे उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवस शरद पवार रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतील, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.