शरद पवारांच्या संसदीय राजकारणाची साठाव्या वर्षात एन्ट्री ; लेक सुप्रिया सुळेसह सुनेत्रा पवारांनी दिल्या शुभेच्छा..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाची साठाव्या वर्षात एंट्री झाली आहे. त्यांची ही ऐतिहासिक राजकीय कारकीर्द लक्षवेधी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आता लेक सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी वडिलांच्या संसदीय कारकीर्दीच्या हिरक महोत्सवाबद्दल भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, शरद पवार यांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे.1967 मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आज तितक्या निष्ठेने पुढे जात आहे. या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते,सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या संदेशात पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा पुढील काळात ही नवी उर्जा देत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.त्यांनी या प्रवासात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेचे आभार मानले.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखीलसंसदीय कारकिर्दीच्या हीरक_महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले देशातील एकमेव नेते आदरणीय पवार साहेब..! साहेबांची ही ऊर्जा लाखो कार्यकर्त्यांसाठी कायम प्रेरणा देत राहो, ही सदिच्छा..! अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या राजकीय कारकीर्दीवर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.