अजितदादांच्या विमान अपघाताबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती; लवकरच प्राथमिक अहवाल….

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी तीन पत्रकार परिषदेतून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते.त्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांच्य विमान अपघातावर भाष्य केलं आहे.’एक महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारण 28 तारखेआधी प्राथमिक अहवाल येईल असं त्यांनी स्पष्ट केल आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत स्पष्ट स्वरूपात डीजीसीए (संस्था) यांनी प्रसिद्धीपत्र दिलं आहे. त्यामध्ये सविस्तर खुलासा केलेला आहे. तपास यंत्रणा काम करत आहे. डीजेसीएच्या माध्यमातून तपास कार्य चालू होतं. त्याच वेळोवेळी आमच्याकडून प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि एक महिन्याच्या प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये जे काय असेल ते स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून यापूर्वी अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विमान अपघातावरून अनेक माहिती सादर केली आहे. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनाम्याची मागणी केली. आमदार रोहित पवारांच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान अजित पवारांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असल्याची माहिती हाती आली आहे. तर थर्मल काही प्रमाणात जळला आहे. ब्लॅकबॉक्स ज्या परदेशी कंपनीचा आहे, त्या कंपनीच्या असिस्टंटला तपासासाठी बोलावल्याची माहिती मिळाली आहे.