भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट ; तरुणाच्या चुलत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता…


पुणे : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी आता तरुणाच्या चुलत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.चुलता अझर शेख याला ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या अपहरण प्रकरणात त्याचा दोघांना पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पोलिसांनी संबंधित तरुणाचा चुलता अझर शेखला ताब्यात घेतलं आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून मिळाली नाही.

अझर शेख हा दौंड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता मानला जातो. संबंधित त्याच्यावर अझर शेखवर वरदहस्त असल्यानेच त्याच्यावर पोलीस इतके दिवस कारवाई करत नव्हते, अशी माहिती आहे. पण आता अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान तरुणीने कोर्टात येऊन आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यानंतर आता संबंधित तरुणाच्या चुलत्याला अटक केल्याने खळबळ उडाली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!