मक्याच्या आर्थिक व्यवहारात आडत व्यापाऱ्याची ३४ लाखांची फसवणूक;पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..


लोणी काळभोर : कृषीमालाच्या आर्थिक व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल साडेचौतीस लाख रुपयांची फसवणूक केला असल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी नानासाहेब सुखदेव कौंडुभैरी (वय ५०, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माणिक विलास मापारे (रा. टाकळी भीमा, शिक्रापूर, पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नानासाहेब कौंडुभैरी हे मार्केटयार्ड येथे आडत भुसार व्यापारी असून शेतकऱ्यांकडून कृषीमाल खरेदी करून तो विविध शहरांतील व्यापाऱ्यांना पुरविण्याचा व्यवसाय करतात. मार्केटयार्ड परिसरातील ब्रोकर प्रकाश लोढा यांच्या ओळखीने माणिक विलास मापारे या व्यापाऱ्याशी त्यांचा संपर्क झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मापारे यांनी तातडीने चार ट्रक (सुमारे १२० टन) मक्याची मागणी केली. त्यानुसार माल लोणी काळभोर येथील गुरुदत्त वजनकाट्यावर पाठविण्यात आला. या पहिल्या व्यवहाराचे सुमारे २२.५० लाख रुपये मापारे यांनी आरटीजीएसद्वारे दिल्याने त्यांच्यावर विश्वास बसला.

यानंतर आणखी मक्याची मागणी करण्यात आली. विश्वासा संपादन झाल्यानंतर कौंडुभैरी यांनी वेगवेगळ्या तारखांना पाच ट्रक मका लोणी काळभोर येथे माणिक विलास मापारे यांच्याकडे पाठविला. या मालाचे एकूण मूल्य ३४ लाख ६० हजार ९१७ रुपये झाले होते. माल ताब्यात घेतल्यानंतरही त्याचे पैसे देण्यास मापारे यांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली.

काही दिवसांनी त्यांना २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तो बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला. संबंधीत व्यापाऱ्याने वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देत संदेश पाठविले, परंतु प्रत्यक्षात पैसे दिले नाहीत. याप्रकरणी नानासाहेब कौंडुभैरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक मापारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!