वाघोलीत होणारी ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ यजमानपदाने दैदिप्यमान, आकर्षक ठरविणार; संयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्याकडून बैठकीत स्पर्धेचे महत्त्व आधोरेखित…


वाघोली : महाराष्ट्र केसरी २०२६ स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या बैठकीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना, जबाबदाऱ्यांचे वाटप, नियोजनाची रूपरेषा तसेच आवश्यक सुविधा व व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी नियोजनाचे प्राथमिक सादरीकरण सर्वांच्या समोर केले. यावेळी अनेकांनी आपला अभिप्राय व सूचना मांडल्या. उपस्थित मान्यवरांनी आपले मौल्यवान मार्गदर्शन करून स्पर्धा भव्य आणि यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रामकृष्ण सातव पाटील यांनी केले. वाघोलीत होणारी ही स्पर्धा कुस्ती प्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, जिल्ह्या सह राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, २०२६ सालची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोली येथे होणार असून, त्यासाठी आवश्यक नियोजन, मैदान व्यवस्था, खेळाडूंची सोय, प्रेक्षकांसाठी सुविधा, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धा भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्या साठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मेघराज कटके, राजेंद्र पायगुडे, नरसेवक रामदास दाभाडे, अनिल सातव, संजय सातव, दादासाहेब सातव, संदीप सातव, संपत गाडे, कैलास सातव, सुरेश सातव, कमलाकर सातव, नटराज सातव, सुनील जाधवराव, कुशाल सातव, केतन जाधव, मारुती गाडे इत्यादी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!