ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप..


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर आणि सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. एका विधवा महिलेवर जळगावातील बड्या पदाधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा खळबळजनक दावा खडसे यांनी केला आहे. संबंधित महिला ही तक्रार देण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र तिथे असलेल्या पोलीस निरीक्षकाने या महिलेची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तिला धमकावून घरी पाठवले. या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला आहे.

या प्रकरणी आता संबंधित महिलेची तक्रार नोंदवली नसल्याने,त्यांनी सावदा पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर थेट निशाणा साधला. या अधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असून, गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मोठी हेराफेरी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक फोटो देखील प्रसारमाध्यमांना दाखवला. पोलीस अधिकारी कशा प्रकारे मंत्र्यांसोबतचे फोटो स्टेटसवर ठेवतात आणि त्यांना कशा प्रकारे संरक्षण दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!