ब्रेकिंग! काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी कोर्टात ‘त्या ‘प्रकरणी दाखल; सुनावणीत काय होणार?

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात 2014 मधील मानहानी प्रकरणी खटला सुरू आहे.या प्रकरणात राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर होत आहेत. या प्रकरणाची सुनावणी होणार असून सुरक्षेच्या कारणास्तव भिवंडी कोर्ट परिसरात पोलीसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. आता या सुनावणीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणाशी संबंधित आज भिवंडी न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रचार सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला होता.महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत संघावर आरोप केल्याप्रकरणी संघाशी संबंधित राजेश कुटे यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणी आज त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
दरम्यान भिवंडी कोर्टात आज राहुल गांधींचे नवे जामीनदार काँग्रेसचे प्रदेश्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. दिवंगत शिवराज पाटील चाकुरकरानंतर हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार असतील. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात सुनावणीला हजर होतील. ये सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी संबंधित प्रकरणाच्या मागच्या चार सुनावणीमध्ये हजर राहिले नव्हते मात्र यावेळी त्यांची उपस्थिती आवश्यक मानली जात आहे. यामुळे आता राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.