भिगवण प्रकरणात ट्विस्ट!तरुणीची रवानगी सुधारगृहात, आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र….


पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या भिगवण अपहरण प्रकरणाला आता वेगळ वळण मिळाल आहे. अपहरणाची तक्रार दाखल झालेली तरुणी शुक्रवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास बारामती पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. न्यायालयातील जबाब आणि वैद्यकीय तपासणीनंतर आता तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने शपथपत्रातून माझे संबंधित तरुणावर प्रेम असून मी घरच्यांना याची कल्पना दिली होती. मात्र लग्नाला त्यांचा विरोध होता म्हणून मी स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेले असे नमूद केल आहे.घरच्यांनी दाखल केलेल्या अपहरणाचा आणि डोळ्यात मिरची पूड फेकल्याचा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचं तिने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

संबंधित तरुणीच्या आईने मुलगी माझ्याकडे नाही आली तर आत्महत्या करीन असा टोकाचा इशारा देखील दिला आहे.पोलीस ठाण्यात तरुणीची आई हजर झाली होती, मात्र मुलीने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत तरुणीला न्यायालयात हजर केले. न्यायालयातील जबाब आणि वैद्यकीय तपासणीनंतर तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

दरम्यान संबंधित तरुणी सुरक्षित असून तिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर सोबत असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. चौकशीनंतरच पुढील कार्यवाही काय करायची? याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!