पोटच्या मुलाने 65 वर्षीय आईचा घेतला जीव, डोंगरगावची धक्कादायक घटना, भयंकर कारण आलं समोर…


चंद्रपूर : एका मुलाने आपल्या जन्मदात्री आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. फक्त कारल्याची भाजी बनवली म्हणून वाद झाला, हाच वाद बघता बघता विकोपाला गेला आणि अनर्थ घडलं.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव जगदीश पेटकुले (वय 36) असून मृत महिलेचे नाव सुमित्राबाई पेटकुले (वय 65 ) आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीची पत्नी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे जगदीश हा आपल्या आई सुमित्राबाई यांच्यासोबतच राहत होता. काल रात्री घरातील स्वयंपाक त्यांनी लवकर आटोपला. मात्र जेवण करताना कारल्याची भाजी बनवल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.

हा वाद क्षणातच उग्र रूप धारण करून हिंसक झटापटीत बदलला.रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत असलेल्या जगदीशने आईला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सुमित्राबाई गंभीर जखमी झाल्या.

त्यांच्या डोक्याला, छातीला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली असता सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेऊन अटक केली

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!