ठाकरे बंधूंच्या युतीत वादंग! स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून मनसेने डिवचलं..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे बंधूत मोठी ठिणगी पडली आहे. या भेटीनंतर तात्काळ ठाकरेंनी मोठा निर्णय घेत मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड केली यामध्ये मनसेला डावण्यात आल्यानंतर आता मनसेकडून ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असा स्टेटस ठेवला आहे.देशपांडे यांनी थेट नाव न घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना पक्षातील अंतर वाढत चाललं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवली होती. ठाकरे- मनसे युतीत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसे ला मिळावा यासाठी आग्रह होता. याबाबत मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव ही दिला होता.

मात्र ठाकरेंनी मोठा डाव टाकत मनसेला डावलून स्वीकृत नगरसेवकांची निवड केली.आता शिवसेनेच्या या भूमिकेला टोला लगावत संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन शिवसेनेला डिवचलं आहे. यामुळे ठाकरे बंधूत मोठी ठिणगी पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.