पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल 28 शाळांना A+ मानांकन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कौतुक

पुणे : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 28 शाळांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत संपूर्ण राज्यातून A+ श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीची आता उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी कौतुक केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याबाबत बोलताना म्हणाल्या,विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सक्षम मनुष्यबळाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केल. ही कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक यांचे सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या या यशामुळे राज्यातील इतर शाळांसाठीही आदर्श निर्माण झाला असून, गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणा मिळणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.