मोठी बातमी! मास्टरमाइंड वाल्मीक कराडच्या ‘त्या ‘प्रकरणात अडचणी वाढल्या, आता थेट मुलाचाही…


पुणे: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये आहे. त्यानंतर आता परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येमागे देखील वाल्मिक कराड असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला आहे.त्यांनी 164 नुसार दिलेल्या जबाबामध्ये या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या मुलाचं देखील नाव घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात आता महत्त्वाचा ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजयसिंह यांनी दिलेल्या जबाब वाल्मीक कराडच्या मुलाचा देखील समावेश आहे.यामुळे हा जबाब देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे आता वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. 164 नुसार विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट देखील होत आहे. यातून आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या वाल्मिक कराड हा संतोष देमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे. त्यानंतर आता या प्रकरणात देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!