अल्पवयीन मुलीस फुस लावून अत्याचार,अखेर फुरसुंगी पोलिसांकडून आरोपीस अटक..


लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीस फुस लावून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध करणाऱ्या आरोपीस फुरसुंगी पोलीसांनी सातारा जिल्ह्यातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी लगट करून तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरीक संबंध बनवले व तिचे फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली होती. याप्रकरणी फिर्यादी निर्भया हिने 8 जानेवारी रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यावरुन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरार आरोपींस अटक करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस पथक तयार करुन शोध घेत असताना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीचे आधारे तसेच तांत्रिक विश्लेषनावरुन आरोपी हा आपले अस्तित्व लपवून वावर करत होता. तसेच तो सतत आपले वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेवून गुन्हयात अटक करणे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. त्याचा शोध घेत असताना तो धोम, ता. वाई, जि. सातारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने माग काढून सापळा रचला व आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हा दाखल होताच तात्काळ गुन्हयाची उकल करण्यात फुरसुंगी पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त परि.-६, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन अमोल मोरे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार सागर वणवे, पोलीस अमलदार हेमंत कामथे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!