धक्कादायक!पुण्यातील महिलेला जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक बलात्कार केला अन्…

पुणे: विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आता पुण्यात एका महिलेला जबरदस्ती रिक्षात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली. आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. आणि तिच्यावर ३ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिले.या नराधमांनी महिलेची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान सीसीटीव्हीमधे ओळखले जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूड देखील बदलले होते. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनी तपास केला आणि अखेर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पंचनामा करत पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्या महिलेची ओळख पटवण्यात येत आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीचीं पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.