अजितदादांच्या विमानात अतिरिक्त इंधन का ठेवण्यात आलं? पुन्हा स्फ़ोट का झाला?रोहित पवारांची धक्कादायक माहिती

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 22 दिवस उलटून गेले तरीही अपघाताचा अहवाल समोर आलेला नाही. त्यानंतर आता या विमान अपघातात संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये रोहित पवारांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताचा जी यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे.अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो.अपघातानंतर स्फोट का झाला? तर याचं उत्तर अतिरिक्त इंधन आहे. बारामतीला जाण्यासाठी एवढं जास्त इंधन घेऊन जाण्याची गरज काय होती? विमानमध्ये इंधनाच्या अतिरिक्त टाक्या का ठेवण्यात आल्या होत्या? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवे दावे समोर आले असून या पत्रकार परिषदेतून रोहित पवारांनी नवीन व्हिडिओ दाखवत शंका व्यक्त केली आहे.अपघातानंतर पुन्हा स्फोट झाले, त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात विमान अपघातानंतर अधिकच स्फ़ोट होत गेले. याचं कारण काय? जो अधिकच्या फ्युएल कॅनचा विषय मांडला होता ते सिद्ध करणारे हे व्हिडिओ आहेत.

विमानात अधिकचे फ्युएल टॅंक पूर्ण भरलेले होते. तुम्हाला फक्त बारामतीत जायचं होतं तर इतकं का भरण्यात आलं?एवढं घेऊन बारामतीला जाण्याचा कारण काय?अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. ब्लॅक बॉक्स निकामी कधी होतो यावर बोलताना ते म्हणाले,डिजिसीएच्या निकषापेक्षा कमी दृश्यमानता होती. विमान मुद्दाम आदळण्यात आलं? अशी शंका यांच्या मनात होती. तसेच 1100 अंशाला जळाला तर ब्लॅक बॉक्स निकामी होतो.असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या विमान अपघातात विम्याचा देखील एक महत्त्वाचा अँगल आहे. ज्यावेळी ते विमान घेतलं होतं ते 35 कोटीनां घेतलं होतं. मात्र त्याच्या इंजिनाची गुणवत्ता पाहिली तर जास्तीत जास्त दहा ते पंधरा कोटी रुपयाला विकलं गेलं असतं.कंपनीतील जुन्या लोकांनी हे जरी 10 कोटी दिल असत तर ते न घेण्याचं योग्य ठरला असत.मात्र त्या विमानाच्या आजची विम्याची किंमत 55 कोटी रुपये होती. पायलेटला किती विमा मिळणार आहे त्याला देखील माहित होतं की नाही याची मला माहिती नाही. मात्र यावरून देखील शंका उपस्थित होत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं.