एका रात्रीत सोन्या चांदीबाबत मोठी घडामोड, सकाळ होताच…; महत्वाची माहिती आली समोर


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मंगळवारी, MCX वरील सोनं आणि चांदीचे दर एका रात्रीत अचानक घसरले. रात्री 8.30 च्या सुमारास चांदी 5 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली, तर सोन्याच्या किमतीतही सुमारे 2.5 टक्क्यांनी घट झाली.

या घसरणीनंतर, आज म्हणजेच बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती रिकव्हरी मोडमध्ये दिसून आल्या. आज 1 किलो चांदी आणि 10 ग्रॅम सोन्याचा दर किती आहे.

सर्वात प्रथम चांदीच्या किमतींबद्दल जाणून घेऊ, जी मंगळवारी रात्री अचानक 5% पेक्षा जास्त घसरली. व्यापारा दरम्यान चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 2.26 लाखांच्या जवळपास पोहोचले होते. रात्रीच्या वेळी अपडेट केलेल्या दरांवर नजर टाकल्यास, MCX वर 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीच्या किमतीत 5.58 % किंवा 13 हजार 278 रुपये प्रति किलोने घट होऊन किंमत 2,26,513 रुपये झाली.

याचा अर्थ असा की 29 जानेवारी रोजी चांदी 4,20,048 या लाईफ टाईम हायवर होती, तिथून दर 1,93,535 रुपयांनी घसरला. मात्र, काल यवहार बंद होताना तो चांदीचे दर 2,28,783 रुपयांवर पोहोचले.

मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी एमसीएक्सवर कमोडिटी ट्रेडिंग सुरू होताच, चांदीच्या किमती रिकव्हरी मोडमध्ये दिसून आल्या. सकाळी 1 किलो चांदीचा भाव 2 टक्क्यांहून अधिक किंवा 5000 रुपयांपेक्षा जास्त वाढीसह 2 लाख 34 हजार रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

चांदीनंतर, आता सोन्याच्या किमतीबद्दल जाणून, चांदीच्या किमतीप्रमाणेच, रात्रीच्या वेळी घसरणीनंतर हा मौल्यवान धातू रिकव्हरी मोडमध्ये दिसून आला. काल रात्री सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरल्यानंतर, आज एमसीएक्सवर कारभार सुरू होता, सोनं हे 1 टक्क्यांहून अधिक वाढले.

काल रात्रीतून घसरण झाल्यानंतर, फ्युचर्स ट्रेडिंगच्या शेवटी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,418 रुपयांवर बंद झाला. तर आज, बुधवारी सकाळी बाजार सुरू होता, 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या या सोन्याची किंमत सुमारे 1.15 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी किंमत 1,53,165 रुपये झाली. ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसून आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!