अजितदादांनी मागे फिरण्यास सुरुवात केलेली कारण अमित शहा….; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास ब्युरो कसून तपास करत आहे. विमानातील ब्लॅक बॉक्सच्या चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी,देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत अजित पवारांनी मागे फिरण्यास सुरुवात केली होती, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने अनेक तर्कवितर्क आता लावले जात आहेत.

संजय राऊत म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा महाविकास आघाडीकडे परतणार होते.ते विधीमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या काही फाईल होत्या त्यामुळे ते भाजपात गेले. ती फाइल पुन्हा उघडण्यात आली. ती फाइल अमित शहा यांच्याकडे गेली. भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाइल बंद झाली नाही. फाईल बंद करण्यासाठी अमित शहा यांचा विरोध होता. दादांनी मागे फिरण्याचा सुरुवात केली होती असा दावा राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखान्याची ती फाईल होती.महाराष्ट्रात तीन महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा सुरू आहे,” असंही राऊत म्हणाले. अजितदादांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचही त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा खळबळ उडाली आहे.

दरम्यान याआधी देखील अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विमान अपघातावर व्यक्त केला होता. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी उद्या म्हणजेच 18 फेब्रवारीला पत्रकार परिषद घेऊन ब्लॅक बॉक्स आणि विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे याकडे ही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.