सलीम खान यांची तब्येत बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल, सलमान खान तडकाफडकी लीलावतीमध्ये…


मुंबई : ज्येष्ठ पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत अचानक खालावल्याने चाहत्यांकडून काळजी व्यक्त होत आहे.

सलीम खान यांना मुंबईतील वांद्रे इथल्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळच हे रुग्णालय असल्याने तातडीने उपचारासाठी त्यांना हलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असून सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांना नेमका कोणता त्रास झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

सलमान खान स्वतः रुग्णालयात पोहोचल्याचेही पाहायला मिळाले आणि त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट जाणवत होती. कुटुंबीयांकडून प्रकृतीविषयी अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पटकथालेखक आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. सलीम-जावेद म्हणून ते ओळखले जायचे. नुकताच त्यांनी लग्नाचा ६१ वा वाढदिवस साजरा केला होता.

सलीम खान यांनी १९६४ मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर १९८१ मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!