ब्रेकिंग!अजितदादांच्या विमानात एक नव्हे दोन ‘ब्लॅक बॉक्स’ ; तपास ब्युरोकडून महत्वाची माहिती

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना तपास ब्युरो या अपघाताचा कसून तपास करत आहे. अशातच आता अपघाताच्या तपासाबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार विमानात दोन ब्लॅक बॉक्स असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार च्या विमानात बसले होते त्या विमानामध्ये दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स बसवण्यात आले होते. अपघाताच्या वेळी लागलेल्या भीषण आगीमुळे हे दोन्ही रेकॉर्डर्स दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात होते, ज्यामुळे त्यांचे बाह्य नुकसान झाले आहे. तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे ‘ब्लॅक बॉक्स’ आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास ब्युरो या प्रकरणाचा तपास अत्यंत निष्पक्ष आणि पुराव्यांच्या आधारावर करत आहे.
दरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आले होती. त्यानंतर त्यावर अनेक प्रश्न उपस्थित करत ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला असे प्रश्न देखील उपस्थित केले होते. मात्र या विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात एएआयबीच्या प्रयोगशाळेला यश आले आहे. मात्र, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर ची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याची तांत्रिक तपासणी अजूनही सुरू आहे. यातील डेटा मिळवण्यासाठी आता थेट उत्पादक देशाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून विशेष तांत्रिक मदत घेतली जात आहे.
दरम्यान तपासाची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवली जाईल आणि योग्य टप्प्यावर याबद्दलची अधिकृत माहिती सर्वांशी शेअर केली जाईल, असे आश्वासन तपास ब्युरोने दिले आहे.