अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल दिल्लीतून मोठी अपडेट, रेकॉर्डरमधील डेटा मिळणार नाही? ब्लॅक बॉक्स झाला खराब…

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काही दिवसांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राज्य अजूनही दुःखात आहे. आता याच अपघाता प्रकरणातबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानातील दोन्ही रेकॉर्डरवरती उच्च तापमानाचा, आगीचा दुष्परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. ज्या देशात विमानाची बांधणी झाली, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवण्यात आली आहे. याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी अनेक आरोप सुरू होते.
AAIB अर्थात Air Accident Investigation Bureau ने तशी माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमानातील डेटा नेमका रेकॉर्ड झाला आहे की नाही, जो रिकव्हरी बॉक्स आहे तो जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर AAIB हे स्पष्टीकरण देण्यात आले. यामध्ये अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अपघातावर शंका व्यक्त केली. अजित दादांच्या विमानाचा अपघात नव्हे तर तो घातपात असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. यामुळे यंत्रणेला जाग आली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली
त्यासाठी त्यांनी 28 जानेवारीचा संपूर्ण घटनाक्रमा मांडून दाखवला, तसेच काही पुरावेही सादर केले. यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार अपघात प्रकरणी अजून कोणत्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार हे खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताबाबत तपास करून घेणार आहेत.