शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन; माजी नगराध्यक्षांच्या निधनाने शोककळा..

पुणे : शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तसेच सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्यावर आज दफनविधी होणार आहेत.

सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून नफिसा बेगम यांनी शहराच्या विकासात मोठी योगदान दिले.तसेच त्यांच्या कार्यकाळात स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार देखील घेतला होता. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात आणि चढउतारात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्या.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नफिसा बेगम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. आज त्यांच्या दफनविधीसाठी शिंदेसेना आणि राज्य सरकारमधील नेतेमंडळी सिल्लोड येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम या सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. तसेच त्यांनी काही काळ सिल्लोडचं नगराध्यक्षपदही भूषवलं होतं. दरम्यान, त्यांच्या अकाली जाण्यामुळे सत्तार कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.